फलटण (जिल्हा सातारा) येथील अनधिकृत पशूवधगृह उद्ध्वस्त
सातारा, १८ मार्च (वार्ता.) – फलटण येथील कुरेशीनगरमध्ये असलेले अनधिकृत पशूवधगृह अनेकवेळा कारवाई करूनही बंद केले जात नव्हते. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलाने ठोस भूमिका घेत फलटण पोलिसांच्या साहाय्याने २ जेसीबीद्वारे उद्ध्वस्त केले.
या अवैध पशूवधगृहाविषयी नागरिकांनी अनेकवेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या. याची नोंद घेऊन फलटण पोलिसांनी अनेकवेळा पशूवधगृह मालकावर गुन्हे नोंद करून कठोर कारवाई केली होती; मात्र तरीही हे पशूवधगृह चालूच होते. त्यामुळे सातारा पोलीस दलाने शेवटी हे पशूवधगृह नष्ट केले.