गुरुदेवांच्या वाङ्मय लेखनप्रपंचामागील कारण !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
मानव जन्म भगवत्प्राप्तीसाठी तर आहे. त्यासाठी जर काही प्रयत्नच नाही केले, तर अखेरीला भगवंतच विचारील, ‘तुला जीवन दिले, काय केले तू या जीवनाचे ? काय मिळवले ? कोणती पूर्णता साधली ? कोणता महिमा प्राप्त केला ? कोणती गरिमा मिळवली ? कोणत्या सत्याचा, सौंदर्याचा आणि मांगल्याचा साक्षात्कार करून घेतला ? ज्ञानी झाला का ? योगी झाला का ? भक्त झाला का ?’, या सर्व प्रश्नांना सामोरे कसे जायचे ? यातून बाहेर कसे पडायचे ? अथवा ही परिस्थिती टाळायची कशी ? यासाठीच गुरुदेवांचा वाङ्मयाचा लेखनप्रपंच आहे.
(सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचाही ग्रंथलेखनाचा हाच उद्देश आहे ! – संकलक)
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)