कोल्हापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदान मासाच्या निमित्ताने रक्तदान !
कोल्हापूर – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ९८ जणांनी रक्तदान केले. या वेळी शहर कार्यवाहक श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री रोहित अतिग्रे, आशिष पाटील, अवधूत चौगले, अथर्व कोल्हापुरे, ओंकार अतीग्रे, नितीन काळे यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.