Karnataka Illegal Slaughterhouse : गोपालनाच्या नावाखाली पशूवधगृह चालवणार्या अब्दुल्ला याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार
विट्ल (कर्नाटक) – कोडंचड्का कोल्लपदवु येथे मादु मूले अब्दुल्ला याने बेकायदेशीररित्या गोपालन केंद्र चालू केले आहे. ते बंद करण्याचा आदेश याआधीही न्यायालयानेही दिला होता. अब्दुल्ला याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा ते चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. गोपालनाच्या आडून तो पशूवधगृह चालवत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा पोलीस विभागाने गांभीर्याने विचार करून तत्परतेने योग्य कारवाई करावी, अशी तक्रार नारायण भंडारी यांनी विट्ल पोलीस ठाण्यात केली आहे. या कृत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून समाजात कायदा आणि सुव्यवस्था स्थापित करावी, असे निवेदन दक्षिण कन्नड जिल्हाधिकार्यांना नारायण भंडारी यांच्याकडून देण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकान्यायालयाचा आदेशही झुगारणारे उद्दाम मुसलमान ! |