भारतीय स्टेट बँकेकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला ‘एल्.ई.डी. वॉल’ प्रदान !
कोल्हापूर – भारतीय स्टेट बँकेकडून १५ मार्चला श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला एक भव्य अद्ययावत ‘एल्.ई.डी. वॉल’(भक्तांना दर्शन होण्यासाठी लावण्यात आलेला डीजिटल फलक) प्रदान करण्यात आली आहे. अद्ययावत ‘एल्.ई.डी. वॉल’मुळे ‘सीसीटीव्ही’ कक्षातील नियोजन आणि पहाणी सुलभ होऊन मंदिर सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. या प्रसंगी बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंग, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी उपस्थित होते.