युद्धाचा फतवा काढणार्या ‘दारूल उलूम देवबंद’वर तात्काळ बंदी घाला !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
वणी (यवतमाळ), १७ मार्च (वार्ता.) – येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनांतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत गृहमंत्री, भारत सरकार, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश आणि पोलीस महासंचालक, उत्तरप्रदेश यांना राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात कारवाई करण्याच्या दृष्टीने निवेदने पाठवण्यात आली.
‘दारूल उलूम देवबंद’ने ‘गझवा-ए-हिंद’ (भारतावर आक्रमण) असा फतवा काढून भारतीय राज्यघटना, कायदे आणि सरकार यांना थेट आव्हान देऊन युद्धाची भाषा केली आहे. सरकारने या संदर्भात ‘दारुल उलूम देवबंद’वर कठोर कारवाई करावी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याला विरोध करणे, नगर येथील ‘विनियार्ड ब्लेस्ड चर्च’मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या तीन पास्टर्सवर कठोर कारवाई करणे आणि बंगाल राज्यात हिंदूंचे दमन रोखण्यासाठी तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यात यावी, अशा मागणीची निवेदने देण्यात आली. उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार मत्ते यांनी निवेदने स्वीकारली. निवेदन देतांना सर्वश्री अंकुश बांदेकर, अभिनव नागपुरे, प्रमोद जेऊरकर, संतोष लक्षेट्टीवर, रोहन पारखी, स्वप्नील पावडे, सुमित निलावार, लहू खामणकर, लोभेश्वर टोंगे आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.