पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले !
पुणे – महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. १५ मार्च या दिवशी त्यांनी मावळते आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. वर्ष २००८ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर आणि अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी अशी पदे भूषवली आहेत