इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेत भारताला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचे आवाहन !
हिंदु धर्माला ‘मलेरिया’ म्हणणार्या उदयनिधी स्टॅलिन यांचीही उपस्थिती !
मुंबई – १७ मार्च या दिवशी शिवाजी पार्क मैदानावर सार्वजनिक सभा घेऊन काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप झाला. या सभेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, यांसह उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधी, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदी संयुक्त पुरोगामी आघाडी आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. हिंदु धर्माला मलेरिया म्हणणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन हेही या सभेला उपस्थित होते. सभेपूर्वी राहुल गांधी यांनी प्रमुख नेत्यांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. या वेळी उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. व्यासपिठावर उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांच्या बाजूला स्थान देण्यात आले होते.