शीव (मुंबई) येथील मानव सेवा संघाच्या आश्रमाच्या तिजोरीतील पैसे गायब !
मुंबई – येथील मानव सेवा संघ या अनाथाश्रमाला येणार्या देणगीतील सुमारे ३६ लाख रुपये चोरीला गेले आहेत. आश्रम व्यवस्थापकांनी १४ मार्च या दिवशी तिजोरी उघडली असता, ही गोष्ट लक्षात आली. या आश्रमात काम करणार्या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ही रक्कम गायब केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रतीक शहा या रोखपालाविरुद्ध शीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे