स्वा. सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणार्या राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी क्षमा मागण्यास सांगितले पाहिजे ! – रणजित सावरकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
मुंबई – राहुल गांधी यांनी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, त्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘‘यांना जोड्याने मारले पाहिजे.’’ आता कमीतकमी त्यांना क्षमा मागण्यास तरी त्यांनी सांगितले पाहिजे. तसे होत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना केले. ते पुढे म्हणाले की, आता राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काही बोलण्याचे धाडस करू शकत नाहीत. काँग्रेसमधील काही लोकांनाच ते आवडत नाही. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला, तेव्हा येथूनच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठा विरोध केला होता.