मोठ्या चित्रकारांची मूळ चित्रे असल्याचे भासवून बनावट चित्रे विकणारी टोळी गजाआड !
मुंबई – प्रसिद्ध चित्रकारांची मूळ चित्रे असल्याचे भासवून बनावट चित्रांच्या विक्रीद्वारे १७ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल आणि इतर आरोपी यांवर ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच मुंबईतील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवली. या वेळी डिजिटल उपकरणांसह संशयित कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी आर्ट गॅलरी, कॉर्पोरेट वकील आणि सराफा व्यापारी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या टोळीकडून ‘बनावट कलाकृती’ या ‘मूळ कलाकृती’ म्हणून दिल्या जात होत्या. ही टोळी राजघराण्यातील व्यक्ती, पुरातन कला संग्रहालय किंवा कलाकृती जमा करणार्या व्यक्ती यांच्याकडे ही चित्रे असल्याचे सांगत असे. नंतर बनावट मालकाच्या नावाने खोटे प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रे करून ते बनावट चित्र विकत असे. यात एम्.एफ्. हुसेन, एफ्.एन्. सौझा, जहांगीर साबावाला, एस्.एच्. रझा, एन्.एस्. बेंद्रे, राम कुमार या प्रसिद्ध कलाकारांच्या चित्राकृती होत्या.