Research Yadanya Smoke:हवनाच्या धुराचा जिवाणूंमुळे होणार्या आजारांवर होणार्या परिणामांवर संशोधन करणार !
हवन साहित्यासाठी अजमेर (राजस्थान) येथील महाविद्यालयाने घेतले पेटंट
अजमेर (राजस्थान) – ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आय.सी.एम्.आर्.ने) ‘हवन’वर संशोधन केल्यानंतर हवन इत्यादी संबंधित साहित्यासाठी ‘पेटंट’ही घेतले आहे. अजमेरच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून ‘हवन औषधी धुराचा विषाणूंवरील परिणाम’ या विषयावर प्रथमच संशोधन करण्यात आले. या विभागाच्या प्रमुख डॉ. विजयलता रस्तोगी यांनी सांगितले की, हवन साहित्य आणि औषधांचे पेटंट मिळाले आहे. जिवाणूंमुळे उद्भवणारे आजार बरे करण्यासाठी ‘हवन’ प्रभावी ठरले आहे. आता यावर सविस्तर संशोधन केले जाणार आहे.
१. ‘हवन’चा धूर आणि वास जिवाणूंंमुळे होणार्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करतो. या संदर्भातील साहित्य आणि औषध यांच्या साहाय्याने केलेल्या हवनामुळे आजूबाजूच्या वातावरणातील जिवाणू नष्ट होतातच, त्याखेरीज व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, असे नुकत्याच ‘हवन’वर केलेल्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे.
२. यज्ञोपचार ही भारतातील एक अतिशय प्राचीन वैद्यकीय प्रणाली आहे. त्याचे वर्णन वेदांमध्येही आढळते. हे सूक्ष्म स्वरूपात कार्य करते. त्याची औषधे शरिरात गेल्यानंतर त्याचा अधिक परिणाम होतो. विशिष्ट मंत्रांच्या सामर्थ्याने औषधी सामग्रीसह हवन केले जाते, तेव्हा हवनाचा धूर रंध्र, तोंड आणि नाक यांतून शरिरात प्रवेश करतो. त्यामुळे लाभ होतो आणि रोगांपासून शरिरास मुक्ती मिळते.
३. आजही तिबेटमध्ये सर्दी, मायग्रेन, डोकेदुखी, अपस्मार, हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार यांंवर औषधी वनस्पतीच्या धुराद्वारे उपचार केले जातात. यज्ञातील धुरामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि डासांसह हवेत पसरणारे ९० टक्के जंतू नष्ट होतात. आजही अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रांवर असलेल्या आश्रमांमध्ये प्रतिदिन यज्ञ केला जातो.
संपादकीय भूमिकाप्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक ! |