समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदूंच्या देवतांच्या विरोधात विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी येथील एम्.पी.-एम्.एल्.ए. न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे. मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका न्यायलयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती.
Uttar Pradesh Court order to register a case against the Samajwadi Party leader.
Case related to Swami Prasad Maurya's attempt to hurt religious sentiments of Hindus by mocking Shri Lakshmi Devi.
👉 When Hindu deities are openly and repeatedly insulted, why doesn't the… pic.twitter.com/yb77VW12Ke
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 17, 2024
गेल्या वर्षी दीपावलीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशभरात लोकांनी घरोघरी लक्ष्मीपूजन केले. त्या वेळी मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही छायाचित्रे ‘एक्स’वर शेअर केली. मौर्य यांनी एक्सवर लिहिले होते की, दीपोत्सवानिमित्त मी माझ्या पत्नीची पूजा करून तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला २ हात, २ पाय, २ कान, २ डोळे आणि २ छिद्र असलेले नाक, एक डोके, एक पोट आणि एक पाठ असते; परंतु ४ हात, ८ हात, १० हात, २० हात, सहस्रो हात असलेले मूल अद्याप या जगात जन्माला आलेले नाही. मग ४ हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते ? (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते अशा प्रकारचे हास्यास्पद विधाने करतात आणि समाजातही विकृत विचार पसरवतात ! – संपादक) तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल, तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा; कारण ती तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण करते, घरात सुख-समृद्धी नांदेल, याची काळजी घेते. तसेच स्वतःचे दायित्व पार पाडते. (एकीकडे श्री लक्ष्मीदेवी म्हणून पत्नीची पूजा करायची आणि दुसरीकडे अशा प्रकारचे विधान करून श्री लक्ष्मीदेवीचा अवमान करायचा, अशा मनोवृत्तीचे मौर्य ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|