Pakistan Terrorist Attack :पाकमधील आतंकवादी आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार
कारवाईत ६ आतंकवादीही ठार
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर वझिरिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात पाकचे २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार झाले. त्याच वेळी पाक सैन्याच्या प्रत्युत्तरात ६ आतंकवादीही ठार झाले.
UPDATE : A total of 7 Pakistani soldiers have been killed, over 17 injured!
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 17, 2024
पाकिस्तानी सैन्याने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ६ आतंकवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यांचे प्रयत्न सैन्याने हाणून पाडले. यानंतर आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले.