मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती शोधण्यासाठी आगर्याच्या बेगम मशिदीचे सर्वेक्षण करा !
कथावाचक कौशल किशोर ठाकूर यांची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे पत्र लिहून मागणी
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील कथावाचक कौशल किशोर ठाकूर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून आगरा मशिदीच्या पायर्यांचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली आहे. या मशिदीच्या पायर्यांखाली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पुरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘ही मूर्ती तीच आहे, जी श्री कृष्णाच्या जन्मस्थानाच्या मंदिराच्या मूळ गर्भगृहात स्थापित करण्यात आली होती’, असे ठाकूर यांचे म्हणणे आहे.
१. कौशल किशोर ठाकूर यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता रीना एन्. सिंह यांनी लिहिलेल्या या पत्रात भारतीय पुरातत्व विभागाने योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावे आणि ‘भगवान श्रीकृष्णाची मूर्ती कुठे पुरण्यात आली आहे ?’, हे शोधून काढावे.
माझ्या लक्षात आले आहे की, ऐतिहासिक कागदपत्रे, साहित्य आणि स्थानिक दंतकथा आहेत, ज्यात भगवान कृष्णाच्या पवित्र मूर्तींच्या उपस्थितीबद्दल सांगितले आहे. ते ‘भगवान केशवदेव’ म्हणून ओळखले जातात. ही मूर्ती भगवान कृष्णाचे पणतू महाराज व्रजनाभ यांनी भगवानांच्या मूळ जन्मस्थानी स्थापित केली होती.
२. संत कौशल किशोर ठाकूर यांचा दावा आहे की ही मूर्ती राधा राणी आणि इतर हिंदू देवतांच्या मूर्तींसह पुरण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या निकालामुळे हिंदु समाजाला भगवान कृष्णाची मूर्ती परत मिळवून देण्यातच साहाय्य होणार नाही, तर ज्या ऐतिहासिक कारणांमुळे देवतेची मूर्ती पुरण्यात आली होती, त्यावरही प्रकाश पडेल.
३. यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी मथुरा दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्यांनी आगरा मशिदीच्या पायर्यांखाली श्रीकृष्णाची मूर्ती पुरण्यात आली असून तेथे खोदकाम करून ती बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|