(म्हणे) ‘मालदीवच्या सुरक्षेसाठी उचललेल्या पावलांमुळे कुणाला चिंता वाटण्याचे कारण नाही !’
मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांचे भारताचे नाव न घेता विधान !
माले (मालदीव) – मालदीव हा छोटा देश नाही. तो स्वतःच्या अधिकार क्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. हिंद महासागरातील आमच्या देशाच्या सुरक्षेची निश्चिती करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे कोणत्याही बाहेरील पक्षाला चिंता वाटण्याचे कारण नाही, असे विधान मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी केले आहे. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स, एअर कॉर्प्स आणि मानवरहित एरियल व्हेइकल्स यांचे उद्घाटन करण्यासाठी आयोजित समारंभात तो बोलत होते.
कोणत्याही देशाचे नाव न घेता मुइज्जू म्हणाले की, मालदीव हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. मालदीव स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असून प्रत्येक बाबतीत स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र रहाण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात भिन्न विचारसरणी असणारे लोक वास्तव्य करतात; मात्र सर्वांचे हित जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळे मालदीवचे सर्व देशांशी असणारे जवळचे संबंध बिघडणार नाहीत.
संपादकीय भूमिका
|