मुसलमान व्यापार्यांना दुकाने रिकामी करण्याचा व्यापारी मंडळाचा आदेश
धारचुला (उत्तराखंड) येथे २ अल्पवयीन हिंदु मुलींना मुसलमान तरुणांनी पळवून नेल्याचे प्रकरण
डेहराडून (उत्तराखंड) – धारचुला येथील शाळेत शिकणार्या २ अल्पवयीन मुली १ फेब्रुवारी या दिवशी बेपत्ता झाल्या होत्या. दोघीही उत्तरप्रदेशातील बरेली येथे सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी बरेली येथे रहाणार्या २ मुसलमान तरुणांना अटक केली. यानंतर धारचुलामध्ये मुसलमानांच्या विरोधात समाजाच्या मनात संतप्त भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी मुसलमान व्यापार्यांच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. धारचुला व्यापारी मंडळाने त्याच्या सदस्य असणार्या ९१ व्यापार्यांना मंडळातून हद्दपार करून त्यांची दुकाने रिकामी करण्याची मुदत दिली आहे. यात ७९ दुकाने मुसलमानांची आहेत. यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, तर एका व्यापार्याने व्यवसाय बंद केला आहे. येथील स्थिती पाहून भंगार कामगार म्हणून काम करणार्या ५० मुसलमानांनी येथून पलायन केले आहे. विशेष म्हणजे काही मासांपूर्वी उत्तराखंडमधील पुरोला येथेही हिंदु तरुणींच्या संदर्भात अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर मुसलमानांवर बहिष्कार घालण्यात आला होता.
१. उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, काही लोकांनी मोर्चा काढून एका विशिष्ट समाजाविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र सध्या स्थिती सामान्य आहे.
२. व्यापारी संघटनेचे सरचिटणीस महेश गरब्याल यांनी सांगितले की, आम्ही बाहेरील व्यापार्यांना येथे राहू देणार नाही. सध्या व्यापारी मंडळात ६०० व्यापारी असून त्यांपैकी ४०० स्थानिक, तर २०० बाहेरचे आहेत. ओळख पटल्यानंतर १७५ व्यापार्यांना वर्ष २००० पूर्वी व्यवसाय केल्याचा पुरावा देण्यासाठी वेळ देण्यात आला.
संपादकीय भूमिका
|