पाकिस्तानात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राद्वारे निवडणुका झाल्या असत्या, तर भ्रष्टाचार झाला नसता !
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे विधान !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित होऊन बराच काळ लोटला आहे; मात्र पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेवर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः देशातील प्रमुख विरोधी पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ने निवडणूक आयोगावर टीका करतांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे. आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही हे सूत्र उपस्थित केले आहे. कारागृहात असलेले इम्रान खान यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ई.व्ही.एम्.) असते, तर निवडणुकीत एवढा भ्रष्टाचार झाला नसता. मतदानातील गैरप्रकारांचे सर्व प्रश्न तासाभरात सुटले असते. पाकिस्तानचा निवडणूक आयोग, काही राजकीय पक्ष आणि संस्था यांनी देशात ई.व्ही.एम्.चा वापर करण्याची योजना उद्ध्वस्त केली.
कारागृहातून पत्रकारांशी संवाद साधतांना इम्रान खान म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीत सार्वजनिक जनादेश चोरणार्यांवर देशद्रोहाखाली कारवाई झाली पाहिजे.