बंगालच्या संदेशखालीतील अन्यायाविरोधात गावकर्यांचा लढा !
१. संदेशखालीचा सामाजिक आणि राजकीय इतिहास !
संदेशखाली हे बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एक विधानसभा क्षेत्र आहे आणि ते बसीरहाट लोकसभा मतदारसंघात येते. वर्ष २०१९ च्या जनगणनेनुसार संदेशखालीची एकूण लोकसंख्या २ लाख १४ सहस्र ४२१ आहे. त्यापैकी १ लाख ६२ सहस्र ९६० हिंदू, तर ५१ सहस्र ४६१ मुसलमान आहेत. ५० च्या दशकात साम्यवाद्यांच्या वर्चस्वाखाली ‘तेवगा आंदोलन’ घडवले गेले. या चळवळीचे जनक हाजी महंमद दानेश हे होते. या आंदोलनामुळे बंगालची मोठी हानी झाली.
२. तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान आणि त्याचे रोहिंग्या सैन्य यांचे गावकर्यांवर अत्याचार !
अ. तृणमूलच्या बहुतांश नेत्यांनी भूमी हडपणे : राज्य सरकार, पोलीस-प्रशासन आणि ‘लिब्रांडू’ (उदारमतवादी) माध्यमे यांचे लाचखोर प्रतिनिधी यांच्यामुळे सर्वसामान्यांवरील अत्याचार दडपले गेले असते; पण आंदोलनाच्या निमित्ताने आता सर्व अन्याय-अत्याचार समोर येत आहेत. संदेशखाली प्रकरणात गेल्या ३० वर्षांपासून तृणमूलचे नेते राजकीय बळाचा वापर करून लोकांवर अन्याय करत आहेत. शिबू हाजरा आणि उत्तम सरदार हे तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याचे सहकारी आहेत. ते गावातील असाहाय्य लोकांवर अनेक दिवसांपासून अत्याचार करतात. तृणमूल नेत्याच्या धाकाने पीडित तोंड उघडू शकत नाहीत. तृणमूलच्या बहुतांश नेत्यांनी गावातील असाहाय्य लोकांना घाबरवून त्यांच्या भूमी हडप केल्या आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली; पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट त्यांनाच मारहाण करण्यात आली. त्यांची सर्व भूमी मासेमारी आणि शेती यांसाठी बळकावली. ज्या भूमीवर वर्षातून दोनदा भाताचे पिक होत होते, तेथे मत्स्यपालन चालू आहे.
आ. महिलांवर सामूहिक अत्याचार : संदेशखालीमध्ये धर्मांधांना मोठ्या प्रमाणात आश्रय दिला जातो. त्यांच्याकडून दिवसेंदिवस सामान्यांवरचा छळ वाढत गेला. शाहजहानचे कट्टर सहकारी उत्तम सरदार, शिबू हाजरा आणि घियासुद्दीन गाझी यांनी सामान्य लोकांवर प्रचंड अत्याचार केले. त्यांनी अत्याचारित लोकांकडून बळजोरीने भूमी कह्यात घेतल्या. त्यांनी लोकांच्या घरात घुसून बळजोरीने त्यांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. महिलांवर अमानुषपणे अत्याचार केले. प्रतिदिन रात्री गावातील महिलांना विविध कामांच्या बहाण्याने पक्ष कार्यालयात बोलावून त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला. अनेक महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले.
३. क्रूरकर्मा आणि कुख्यात शाहजहानची दडपशाही !
तृणमूल काँग्रेसचा प्रभावशाली नेता शेख शाहजहानवर अनेक गंभीर आरोप आहेत. असे असूनही तो तेथील अशिक्षित धर्मांधांमध्ये लोकप्रिय आहे. शाहजहानचा उदय हा साम्यवादी विचारसरणीच्या काळात झाला होता; पण तेव्हापासून त्याच्या समाजविघातक कारवाया वाढत गेल्या. वर्ष २०११ मध्ये तृणमूल सरकार आल्यापासून त्याचा क्रूर चेहरा दिसून येत आहे. शाहजहानने उत्तर २४ परगण्यातील संदेशखालीपासून दक्षिण २४ परगण्यातील मालंचपर्यंत त्याचे अवैध धंदे वाढवले आहेत. मेंढ्या, वीटभट्ट्या, वाहतूक आणि भाजीपाला अशा विविध क्षेत्रांतील अवैध कामांमध्ये गुंतल्यामुळे तो या भागातील तृणमूल काँग्रेस पक्षाचा सर्वांत कुख्यात नेता समजला जातो. शाहजहानने वर्ष २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्याचे काका इस्लाम शेख हे मार्क्सवादी कम्युनिस्टचे स्थानिक नेते होते. शाहजहानच्या नावावर प्राणघातक आक्रमण ते हत्या असे अनेक गुन्हे नोंद आहेत. गेल्या ८ वर्षांपासून तो रोहिंग्या धर्मांधांना विविध गावांमध्ये घरे बांधून देण्यासाठी साहाय्य करत आहे. त्यांच्या माध्यमातून विविध गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. शाहजहान आणि त्याचे सहकारी गावोगावी हिंदूंना संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.
शाहजहानचा भाऊ सियाजुद्दीन शेख आणि त्याच्या इतर अनुयायांनी प्रभाग क्रमांक-१ आणि २ मधील अनेक लोकांच्या भूमी बलपूर्वक त्यांच्या नावावर नोंदवल्या आहेत. अनुमाने ८०० बिघा भूमी (१९८ एकर) त्यांच्या कह्यात आहे. त्यापैकी १४६ बिघा भूमी (४८ एकर) एकट्या सियाजुद्दीन शेख याच्या नावावर आहे. सध्या कारागृहात असलेले अन्नमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांच्यावर रेशनचा तांदूळ आणि गहू अवैधपणे विकल्याचा आरोप आहे. या मलिक यांचा शेख शाहजहान हा निकटवर्तीय समजला जातो. १२.१.२०२४ या दिवशी त्याच्या घराची झडती घेत असतांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) अधिकार्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. संदेशखालीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे वृत्तसंकलन चालू असतांनाही शेख शाहजहान आणि त्याचे गुंड यांनी मोठा हिंसाचार माजवला होता. त्या घटनेपासून शेख शहाजहान हा ५५ दिवस पसार होता. ‘ईडी’च्या भीतीने तो या भागातून पळून गेला होता.
४. जनता आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते (गुंड) यांच्यात संघर्ष !
अ. संदेशखाली भागातील अशांततेचे मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतर झाले आहे. आता स्थानिक नागरिक ममता सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असंतोष त्यांच्या आंदोलनातून दिसून येत आहे.
आ. पोलीस अधिकारी राज्य सरकारचे बाहुले म्हणून काम करत आहेत. गावकर्यांनी तृणमूलचे नेते शिबू हाजरा यांच्या बागेत घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी हाजरा याची माणसे आणि गावकरी यांच्यात झटापट झाली. त्यात अनेक जण घायाळ झाले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच बंदुकीने आक्रमण केले, असा आरोप गावकर्यांनी केला. घायाळांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले. गावकर्यांवर तृणमूलच्या गुंडांनी आक्रमण केल्याचे दिसले; पण एकालाही अटक करण्यात आली नाही. याउलट पोलिसांनी १५ गावकर्यांनाच अटक केली. त्यात १५ पैकी ४ महिला आहेत. त्यांच्यावर १८७ गुन्हे नोंदवले आहेत.
इ. दिवसेंदिवस पीडित जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. संदेशखाली येथील वंचित आणि शोषित लोकांनी शाहजहानसह २ तृणमूल नेत्यांच्या विरोधात निदर्शने केली. गावकर्यांना त्यांची भूमी परत मिळावी, या मागणीसाठी जंगल मौजा पोलीस ठाणे आणि दरी येथील गटविकास अधिकारी (बीडीओ) कार्यालय येथे निदर्शने केली.
ई. उत्तम सरदार याने आदिवासींना दरीच्या जंगल परिसरात मासेमारी करण्यास सक्त मनाई केली. याविषयी गावकर्यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार करूनही उपयोग झाला नाही. सर्व काही असतांनाही वनविभाग, गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे. सध्या आंदोलनामुळे उघडकीस आलेले सर्व अत्याचार राज्य सरकार जाणूनबुजून दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
उ. संदेशखालीतील लोक त्यांच्या भूमी परत मिळवण्याच्या मागणीसाठी आणि सरकारी कालवे वापरण्याच्या अधिकारासाठी ३१ जानेवारीपासून आंदोलन करत आहेत. ‘संदेशखालीचा तृणमूल नेता शेख शाहजहान आणि त्याचे २ मुख्य सहकारी या भूमींवर वर्षानुवर्षे ताबा घेऊन भाड्याचे पैसे देत नाहीत’, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. त्यांनी त्यांच्या भूमीचा हक्क मिळवण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन चालू केले. ते आंदोलन थांबवण्यासाठी शेख शाहजहान, शिबू हाजरा, उत्तम सरदार आणि लल्टू घोष यांनी संदेशखाली पोलीस ठाण्याच्या साहाय्याने गावकर्यांवर भ्याड आक्रमण केले.
ऊ. अलीकडे संदेशखाली पोलीस ठाण्याच्या त्रिमोहिनीमध्ये तृणमूलने एक बैठक घेतली होती. बैठकीनंतर कर्नाखाली गावाच्या आंदोलकांवर आक्रमण करण्याचा कट रचण्यात आला. ही माहिती गावकर्यांच्या कानावर पोचताच प्रतिकाराचा संदेश घराघरात पसरला. स्वत:चे रक्षण करण्यासाठी गावातील महिला लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर तुषाखाली, जेलियाखाली, खुलना आणि हातग या भागातून सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी एकत्र येत संदेशखाली फेरी घाटात ग्रामस्थांवर आक्रमण केले. त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच ग्रामस्थांवर काच आणि आम्ल (ॲसिड) यांच्या बाटल्या फेकून आक्रमण केले. यात काही ग्रामस्थ घायाळ झाले. त्यापैकी शंभूसिंह आणि त्यांच्या सहकार्यांची प्रकृती गंभीर आहे. त्या क्षणापासून प्रतिकार वाढत चालला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत धोका ओळखून गुन्हेगार मोटारीतून पसार झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी संदेशखाली पोलीस ठाण्याला घेराव घालून निषेध व्यक्त केला आणि ‘तृणमूल नेते शाहजहान, शिबू हाजरा, उत्तम सरदार, लल्टू घोष यांना अटक करावी’, अशी मागणी केली. या सर्व घटना घडल्यानंतर शीघ्र कृती दलासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला.
ए. धामखाली-संदेशखाली या गावांमधील फेरी सेवा बंद करण्यात आली. सर्व दुकानेही बंद होती, पोलिसांनी असाहाय्य ग्रामस्थांवर अमानुष लाठीचार्ज केला. त्यात एक जण गंभीर घायाळ झाला असून अन्य गावकरी रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यामुळे सामान्य ग्रामस्थांमध्ये आणखी खळबळ उडाली. संदेशखाली ठाण्याभोवती निदर्शने चालू झाली. ग्रामस्थांच्या दबावामुळे अखेर पोलिसांनी उत्तम सरदार यांच्यासह दोघांना अटक केली आणि ‘उर्वरितांना अटक करण्यात येईल’, असे सांगून पोलीस-प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना शांत केले.
ऐ. दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळी गावकर्यांना कळले की, पोलिसांनी उत्तम सरदारला अटक केली नाही. भरत दास आणि पालन सरदार यांना अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा संतापले.
५. आंदोलकांच्या तीव्र प्रतिकारामुळे ममता सरकारचा बचावात्मक पवित्रा
अ. शेख शाहजहान आणि त्याचे साथीदार दिवसाढवळ्या लोकांवर अत्याचार करायचे. आतापर्यंत सर्व माहिती असूनही पोलीस-प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्या तृणमूल काँग्रेस तीव्र प्रतिकारासमोर मागे हटत आहे. संदेशखाली ग्रामस्थांचा पोलीस आणि प्रशासन यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आता पीडित आणि शोषित यांच्या विरुद्धचा संदेश खेड्यापाड्यातून शहराच्या गल्लीबोळापर्यंत पोचला आहे.
आ. शेख शाहजहान गेल्या ३ वर्षांपासून गावातील महिलांना मध्यरात्री १२ नंतर पक्ष कार्यालयात बोलावत असे. त्या न गेल्यास त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिली जात असे. आता संदेशखाली येथील गृहिणी महिला अत्याचाराच्या तक्रारी करत आहेत. संदेशखालीमधील हिंसाचारामुळे संपूर्ण बंगाल ढवळून निघाला आहे. राज्य सरकारच्या अधिकार्यांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही. संपूर्ण बसीरहाट आणि संदेशखाली येथे एकाच वेळी चालू असलेल्या आंदोलनांमुळे राज्य सरकारला जनजातीय महिलांसमोर आत्मसमर्पण करणे भाग पडले आहे. परिणामी ११ फेब्रुवारी २०२४ या दिवशी जिल्हा परिषदेचे नेते तथा पीडित महिलांवर अत्याचार करणारे उत्तम सरदार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्याच रात्री त्यांना अटक करण्यात आली.
इ. या उत्तम सरदारापेक्षाही धोकादायक असा पीडितांवर अत्याचार करणारा आणि गरिबांच्या भूमी बळकावणारा शिबू हाजरा संदेशखालीत रहातो. संदेशखालीसह बसीरहाटमध्ये सर्वत्र चळवळ जोर धरू लागली आहे. १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी भाजपच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव घालण्यात आला. याविरोधात पोलिसांनी आंदोलकांवर अंदाधुंद लाठीमार केला, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. या आंदोलनामध्ये अनेक आंदोलक घायाळ झाले. या वेळी ११ आंदोलकांना अटक करण्यात आली.
ई. १४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पोलिसांच्या अत्याचारात गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १५ फेब्रुवारी या दिवशी विरोधी पक्षनेते संदेशखाली येथे पीडितांच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना पोलिसांनी तेथे जाण्यापासून थांबवले. महिला संरक्षण आयोग आणि अनुसूचित जाती आयोग यांनाही संदेशखालीमध्ये प्रवेश दिला नाही. शिबू हाजरा आणि शेख शहाजहान यांच्या अटकेच्या सततच्या मागणीमुळे संदेशखाली पुन्हा पुन्हा धुमसत आहे.
उ. गेले काही दिवस या महिला आंदोलक आणि पीडित महिला तक्रारदार यांच्या घरांवर तृणमूलचा नेता शेख शाहजहान अन् शिबू हाजरा यांच्या गुंडांसह पोलिसांच्या टोळक्याने रात्री आक्रमणे केली. आंदोलक महिलांच्या घरांची तोडफोड केली, तसेच त्यांना विवस्त्र करून त्यांना मारहाण केली. आंदोलकांच्या दबावामुळे त्यापैकी शिबू हाजरा याला १७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पोलिसांनी अटक केली. सध्या शाहजहानचा जावई पोलीस संरक्षणात संदेशखालीच्या एका कोठडीत आहे.
६. शाहजहानच्या दहशतीमुळे संदेशखालीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य बंद
एकेकाळी संदेशखालीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध उपक्रम चालू होते. शाहजहानच्या उदयानंतर गेल्या २ दशकांमध्ये या भागातील रा.स्व. संघाच्या शाखा हळूहळू अल्प होत गेल्या. पूर्वी दैनंदिन शाखांची संख्या मोठी असायची, आता त्या शाखा जवळपास बंद पडल्या आहेत. आता केवळ प्रभाग क्रमांक १ मध्ये विश्व हिंदु परिषदेचे काम चालू आहे. या भागात अनेक स्वयंसेवक आहेत; पण ते शाहजहान आणि त्याचे सहकारी यांच्या भीतीने कोणतेही काम करू शकत नाहीत. संदेशखालीतील कालीनगर ग्रामपंचायतीमध्ये विश्व हिंदु परिषदेचा भूखंड असून त्याचा वापर लोकसेवेसाठी करण्यात येत होता. शाहजहानच्या दहशतीमुळे त्या ठिकाणी काम बंद पडले आहे. आता ती जागा परत आपल्या कह्यात घेण्यासाठी ते हतबल झाले आहेत.’
– ‘विश्व संवाद केंद्रा’च्या सत्यशोधन समितीचा अहवाल
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |