सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’तील श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, म्हणून त्यांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशतीचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती. अनुष्ठानाच्या वेळी श्री दुर्गादेवीच्या चित्रातून पुष्कळ प्रमाणात शक्ती (चैतन्य) प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. देवीकडून प्रक्षेपित होणार्या शक्तीमुळे देवीच्या चित्रासमोर उभे राहिल्यावर आपल्याला मागे ढकलल्यासारखे जाणवते.
श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी २२ ते २५.१.२०२४ या कालावधीत देवीच्या चित्राच्या ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे चाचण्या करण्यात आल्या. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या नोंदी पुढे दिल्या आहेत. १० मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या नोंदी’ वाचल्या. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/772189.html
२. श्री दुर्गादेवीच्या चित्रातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचा (चैतन्याचा) खोलीतील लादीवर झालेला परिणाम
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशती पाठाचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती. दारातून देवपूजेकडे दृष्टी नेल्यावर भावजागृती होते. या पूजेचा परिणाम लादीवरही दिसून येत होता, उदा. पूजेच्या जवळ ४-५ फूट जाऊ लागल्यावर लादीचा स्पर्श उष्ण जाणवणे आदी.
श्री दुर्गादेवीच्या चित्रातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचा (चैतन्याचा) खोलीतील लादीवर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी लादीची वेगवेगळ्या अंतरावरील छायाचित्रे काढून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या छायाचित्रांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
२ अ. खोलीतील लादीच्या छायाचित्रांच्या नोंदी
टीप – लादीच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षा अधिक असल्याने ती लोलकाने मोजण्यात आली.
वरील सारणीतून लक्षात आलेली सूत्रे –
१. लादीच्या छायाचित्रांपैकी ‘१३ ते १५ फूट’ आणि ‘१७ ते १९ फूट’ या २ छायाचित्रांमध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली.
२. लादीच्या छायाचित्रांपैकी ‘१७ ते १९ फूट’ या छायाचित्रात सर्वांत अल्प प्रमाणात, तर ‘३ ते ५ फूट’ या छायाचित्रात सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. ‘३ ते ५ फूट’ या छायाचित्राच्या खालोखाल ‘७ ते ९ फूट’ या छायाचित्रात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
वरील निरीक्षणांतून लक्षात आले की, देवीची पूजा ज्या ठिकाणी केली होती, तेथील लादीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला आहे. थोडक्यात या संशोधनातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत केलेल्या अनुष्ठानाच्या कालावधीत श्री दुर्गादेवीच्या चित्रातून किती मोठ्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित झाली’, हे लक्षात आले. विशेष म्हणजे प्रतिदिन हे प्रमाण वाढत जाऊन शेवटच्या दिवशी ते सर्वाधिक झाले. एवढेच नव्हे, तर अनुष्ठान पूर्ण होऊन ६ दिवस उलटून गेल्यानंतरही देवीच्या चित्रातील चैतन्य टिकून होते.’ समाप्त)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.२.२०२४) ॐ
इ-मेल : mav.research2014@gmail.com
|