JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक

श्रीनगर – काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.  केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष २०१९ मध्ये या संघटनेवर बंदी घातली होती. ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद आणि फुटीरतावाद यांना प्रोत्साहन देणार्‍या कारवायांमध्ये गुंतलेली होती.

देशाला अखंडतेला आव्हान देणार्‍यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल ! – अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना आव्हान देणार्‍यांस कठोर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आतंकवादी कारवायांमध्ये गुंतलेले नागरिक आणि संघटना यांच्याविषयी सरकार कठोर राहील.

या ४ संघटनांवरही बंदी !

केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘जे-के पीपल्स लीग’, ‘जे.के.पी.एल्. (मुख्तार अहमद वाझा)’, ‘जे.के.पी.एल्. (बशीर अहमद तोटा)’, ‘जे.के.पी.एल्. (गुलाम महंमद खान)’ आणि ‘जे.के.पी.एल्. (अजीज शेख)’ या ४ संघटनांवर बंदी घातली आहे.