Owaisi Challenges CAA : सीएएच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी सर्वोच्च न्यायालयात !
नवी देहली – केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
#AsaduddinOwaisi approaches Supreme Court challenging #CAA pic.twitter.com/FqPuSnWGNe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 16, 2024
‘हा कायदा भेदभाव निर्माण करणारा असल्याने याची कार्यवाही करण्यावर बंदी घालावी’, अशी मागणी त्यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे. याखेरीज या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या याचिकेसह २०० हून याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत.