Christians Oppose To Celebrate Holi : मुंबईत कोळी बांधवांना होळी साजरी करू देण्यास ख्रिस्त्यांचा विरोध; जिवे मारण्याची धमकी !
सरकारी जागेवर ख्रिस्त्यांचे अतिक्रमण !
मुंबई – येथील मढ समुद्रकिनार्याजवळील मढ-लोचर या हिंदुबहुल कोळी लोकांच्या गावात येथील स्थानिक कोळ्यांना होलिका दहन आणि त्या संबंधीच्या प्रथा-परंपरा पाळण्यास येथील ख्रिस्त्यांनी विरोध केला. यासह कोळी बांधवांना जिवे मारण्याची धमकी दिली. याविषयी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांना कलम १४९ ची नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त अन्य काही केलेले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यंदा होळी, म्हणजे हुताशनी पौर्णिमा २४ मार्च या दिवशी आहे. येथील कोळी बांधव हा सण १५ दिवस साजरा करतात. ते १५ दिवस एकत्र येऊन लोकगीते गातात, तसेच लोकनृत्य करतात आणि शेवटच्या दिवशी होलिका दहन करतात. वर्ष १९६४ पासून येथे कोळी बांधव हा सण साजरा करतात.
हा सण साजरा करण्यासाठी स्वच्छता आणि पूर्वसिद्धता करण्यासाठी एकत्र आलेल्या हिंदूंना रिचर्ड किल्मो, जेकब किल्मो, केविन कोळी, शॉन कोळी, फुलुबाई कोळी, प्रिसीला किल्मो या शेजारच्या पाड्यातील ख्रिस्त्यांनी ‘होळी पेटवल्यास दगडांनी ठेचून मारू’, अशी धमकी देऊन धक्काबुक्की, तसेच शिविगाळ केली.
यापूर्वी संबंधित शासकीय जागेवर ख्रिस्त्यांनी दगड टाकून अतिक्रमण करण्याचाही प्रयत्न केला होता. या गावाचे ‘कोळी समाज कृती समिती’चे अध्यक्ष पांडुरंग कोळी यांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात होड्या जिथे लावल्या जातात, तिथे ख्रिस्त्यांनी दगड टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सण साजरा करण्यासही अडथळा होत आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील अतिक्रमण हटवले न गेल्यास कोळी समाज ते हटवेल, अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रीती राऊत यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिका
|