‘हुबळी-दादर एक्सप्रेस’ला किर्लोस्करवाडी येथे थांबा संमत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप
सांगली – किर्लोस्करवाडी येथे ‘हुबळी-दादर एक्सप्रेस’ला थांबा संमत होण्यासाठी बर्याच दिवसांपासून असणार्या मागणीला यश आले. ‘रेल्वे बोर्ड’चे संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांनी त्या संदर्भातील आदेश त्यांच्या स्वाक्षरीने पारीत झालेले आहेत आणि ‘हुबळी-दादर एक्सप्रेस’ला किर्लोस्करवाडी येथे थांबा संमत झाला आहे. सातत्याने किर्लोस्करवाडी येथे नवीन रेल्वे थांबा संमत करण्यासाठी मागणी होत होती. थांबा संमत झाल्यामुळे प्रवाशांना लाभ होणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.