कोट्यवधी रुपयांच्या मॅफेड्रोनची तस्करी करणार्या धर्मांधाला अटक !
पुणे – येथील सोमवार पेठेत मॅफेड्रोन विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने पकडले. त्या वेळी पप्पू उपाख्य महंमद कुतुब कुरेशी (वय ४७ वर्षे) हा मॅफेड्रोन निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुरुकुंभ येथील कारखान्यात पुरवत असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले; परंतु कुरेशी पसार झाला होता. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कर्नाटकातील यादगिरमधून आरोपीला कह्यात घेतले. त्याच्याकडून ५२ सहस्र रुपयांची रोकड आणि २ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत. कुरेशीला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नंतर पोलिसांनी विश्रांतवाडी, देहली, सांगली, तसेच कुरकुंभ येथील कारखान्यात धाडी टाकून ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचे मॅफेड्रोन जप्त केले. मॅफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार देहलीतील संदीप धुनिया असून तो नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याचे अन्वेषणात उघड झाले. या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून ६ जणांचा शोध घेण्यात येत आहे. (बहुसंख्या अनैतिक कारवायांमध्ये धर्मांधांचाच हात असतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिका :नवीन पिढीला व्यसनाधीन करून राष्ट्रहानी करणार्यांवर कठोर कारवाई करा ! |