चंद्रपूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्या २५ बैलांची पोलिसांकडून सुटका !
३ आरोपींना अटक !
चंद्रपूर – जिल्ह्यातील राजुरा परिसरातून लक्कडकोट मार्गे भाग्यनगर (हैद्राबाद, तेलंगाणा) शहरात १४ मार्च या दिवशी विनाअनुमती २५ बैल घेऊन जाणारा कंटेनर विरूर पोलिसांनी जप्त करून त्यातून २५ बैलांची सुटका केली.
‘हे सर्व बैल कत्तलीसाठी नेण्यात येत होते’, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून २७ लाख २५ सहस्र रुपयांचा माल जप्त केला आहे. १४ मार्च या दिवशी वाहनातून गस्त घालत असतांना राजुरा येथून लक्कडकोट मार्गे भाग्यनगर येथे एका तेलंगाणा ‘पासिंग’च्या कंटेनरमध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती.
पोलिसांनी आर्.टी.ओ. नाका, लक्कडकोट येथे पंचासमक्ष नाकाबंदी केली असता रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास १ कंटेनर येतांना दिसला. या वाहनाचा चालक सैय्यद फारुख सैय्यद युसुफ (वय ३८ वर्षे), शेख जलील महंमद शेख (वय ३८ वर्षे), कबीर जैनुद्दीन शेख (वय २५ वर्षे) या तिघांना सदर वाहनाविषयी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यात अतिशय दाटीवाटीने आणि चारापाण्याची व्यवस्था न करता ठेवलेले २५ बैल होते. ही जनावरे गडचांदूर येथील अज्जु कुरेशी यांची असून ती भाग्यनगर येथील पशूवधगृहात घेऊन जात असल्याचे धर्मांधांनी सांगितले. धर्मांध आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही त्या न थांबवता येणे, हे प्रशासनाचे घोर अपयश ! |