रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी आल्यावर जिज्ञासूला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘१ ते ३.१२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘मराठी साधना शिबिर’ झाले. त्यानिमित्त रामनाथी आश्रमात आल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ‘मला आश्रमात आल्यावर शांतीची अनुभूती आली.

श्री. भूषण पाटील

२. प्रत्येक साधकाच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मीही आनंदित झालो. साधकांशी बोलतांना ‘आमची पुष्कळ जुनी ओळख आहे’, असे मला वाटले.

३. साधक आश्रमात आलेल्या सर्व शिबिरार्थींची काळजी घेत होते. ‘साधकांच्या रूपात प.पू. गुरुदेव आहेत’, असे मला जाणवले.

४. पूर्वी माझा नामजप अत्यल्प व्हायचा; परंतु आश्रमात आल्यानंतर माझा नामजप होऊ लागला. माझे गुरुस्मरणही होऊ लागले.

५. येथील साधकांची तळमळ पाहून ‘मीही तळमळीने सेवा केली पाहिजे’, असे मला वाटले.

६. स्वागतकक्षातील भगवान श्रीकृष्णाच्या चित्रात मला पुष्कळ चैतन्य जाणवले. ‘ते चैतन्य मलाही मिळत आहे’, असे मला जाणवले.

७. ध्यानमंदिरात होणार्‍या आरतीच्या वेळी मला चैतन्य मिळून माझे मन पुष्कळ शांत झाले.

८. शिबिरात दैवी बालके आली होती. त्यांना पाहून आणि त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू येत होते.’

– श्री. भूषण शामराव पाटील, जळगाव (१९.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक