सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची घेतली सदिच्छा भेट !
सद्गुरु स्वाती खाडये यांनी मडिगेरी यांना श्रीरामाचे चित्र भेट देऊन केला सत्कार !
पुणे – भाजपचे सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी यांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग असतो. संस्थेच्या कार्याचे ते नेहमीच कौतुक करतात. श्री. मडिगेरी यांनी नुकतीच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली होती. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी भोसरी येथे श्री. मडिगेरी यांची सदिच्छा भेट घेऊन सनातन संस्थेचे श्रीरामाचे चित्र भेट दिले. त्यानंतर श्री. मडिगेरी यांनी सद्गुरु स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक आणि पू. (सौ.) संगीता पाटील यांचा सन्मान केला. आश्रमात गेल्यावर आलेले अनुभव सांगतांना श्री. मडिगेरी म्हणाले, ‘‘आश्रमातील जीवनपद्धत आणि साधकांमध्ये असलेली नम्रता मला पुष्कळ आवडली. येथून पुढेही नेहमीच या कार्याला माझे सहकार्य असेल.’’