Goa Advisory On HOLI : शिमगोत्सवाच्या वेळी वनक्षेत्रातील आगीच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी !
पणजी, १४ मार्च (वार्ता.) : शिमगोत्सवात धार्मिक विधींसाठी जंगलात जाणार्या लोकांनी आगीच्या घटना टाळाव्यात, यासाठी वन विभागाकडून एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. उघड्यावर वस्तू जाळू नयेत; वन क्षेत्रात सिगारेट, विडी ओढणे टाळावे; सुके गवत किंवा पाने असलेल्या जागा नियमित स्वच्छ कराव्यात; कचरा, काचा, आरसा यांसारख्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी आदी सूचनांचा यात समावेश आहे.
या परिपत्रात म्हटले आहे की, काही लोक धार्मिक विधी करण्यासाठी जंगल किंवा संरक्षित क्षेत्र या ठिकाणी प्रवेश करतात. अशा वेळी वनक्षेत्रात आग लागण्याची भीती असते. संरक्षित क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवेश करणे किंवा त्या ठिकाणी उघड्यावर आग लावणे कायद्याने गुन्हा आहे.’’
संपादकीय भूमिका
मागील वर्षभरात वनक्षेत्रांत आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी वन विभाग काय करत आहे ? केवळ हिंदूंच्या सण आला की, अशा मार्गदर्शक सूचना का जारी केल्या जातात ? |