पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि त्र्यंबके यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी
कोल्हापूर – कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिवाणी न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार भारतीय पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर्.एस्. त्र्यंबके यांनी १४ मार्च या दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत मूर्तीची पहाणी केली. १५ मार्चला पुन्हा पहाणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. या संदर्भातील कोणतीही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिली जाणार नाही.
( सौजन्य channel B )
या प्रसंगी याचिकाकर्ते श्रीपूजक गजानन मुनीश्वर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, अधिवक्ता प्रसन्ना मालेकर, दिलीप देसाई, अजित ठाणेकर उपस्थित होते.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात पहाणी करून अहवाल सादर करण्याच्या संदर्भात श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट केला असून त्यावर सुनावणी चालू आहे.