धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या बलीदानाचे स्मरण ठेवूया ! – जुगल किशोर वैष्णव, हिंदु जनजागृती समिती
पट्टणकुडी (जिल्हा बेळगाव) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. याचे स्मरण ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास हा आपण सर्वांनी व्रतस्थ होऊन पाळूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगल किशोर वैष्णव यांनी केले. येथील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने बलीदान मासाच्या निमित्ताने व्याख्यान ठेवण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सर्वश्री अजय पुणेकर, सुयोग घाटगे, संदेश काशीदकर यांसह मोठ्या संख्येने धर्मवीर युवक उपस्थित होते.