Bareilly Maulana Supports CAA : बरेली (उत्तरप्रदेश) येथील मौलाना रिझवी यांचा ‘सीएए’ला उघड पाठिंबा !
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
बरेली (उत्तरप्रदेश) : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशभरात लागू करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशात लोकांना या कायद्याविषयी समजावून सांगितले जात आहे. उत्तरप्रदेशातील संवेदनशील मानल्या जाणार्या बरेली जिल्ह्यातील मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी ‘सीएए’ला उघडपणे पाठिंबा दिला आहे. मौलाना रिझवी यांनी या कायद्याचे स्वागत केले आहे.
Shahabuddin Razvi Bareilvi from Bareilly (Uttar Pradesh) openly supports '#CAA'#CAAImplementedpic.twitter.com/iYjwSCn6cV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2024
मौलाना शहाबुद्दीन रिझवी म्हणाले की,
‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’ ‘सीएए’ कायद्याचे स्वागत करते. या कायद्यात मुसलमानांशी संबंधित काहीही नाही. हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या आणि अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या बिगर मुसलमानांसाठी करण्यात आला आहे. यातील ज्यांना नागरिकत्व मिळालेले नाही, त्यांना नागरिकत्व देण्यासाठी सरकारने हा कायदा केला आहे.
सौजन्य : The Leader Hindi
समाजवादी पक्षावर टीका
मौलाना शहाबुद्दीन रिझवी म्हणाले की, भारतातील मुसलमानांना या कायद्याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. हा कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेऊ शकत नाही, तर नागरिकत्व बहाल करण्याचा हा कायदा आहे. मौलाना शहाबुद्दीन यांनी समाजवादी पक्षावर टीका करतांना म्हटले की, काही राजकीय पक्ष मुसलमानांचा निवडणुकीत वापर करू इच्छितात आणि ‘सीएए’चा धाक दाखवून राजकीय खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजवादी पक्ष मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. या जोरावर या पक्षाला लोकसभा निवडणुकीत मते मिळवायची आहेत.