Chikalthana StonePelting By Muslims : चिकलठाणा येथे सलग दुसर्या दिवशीही महाआरतीनंतर धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !
तिघे घायाळ; दोन्ही समाजांची प्रार्थनेची वेळ पालटूनही धर्मांधांचा धुडगूस !
छत्रपती संभाजीनगर : १२ मार्चच्या रात्री चिकलठाणा येथील कामगार कॉलनीमधील हनुमान मंदिरात आरती करण्याच्या कारणावरून धर्मांधांनी धुडगूस घालून २ हिंदूंना मारहाण केली होती. १३ मार्च या दिवशी रात्री सकल हिंदु समाजाच्या वतीने याच हनुमान मंदिरात आयोजित महाआरतीनंतर धर्मांधांनी पुन्हा हिंदूंवर दगडफेक केली. यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी झालेल्या दगडफेकीत ३ हिंदु तरुण घायाळ झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
Stone pelting on Hindu youth after the Maha Aarti on second consecutive day in Chikalthana!
Three injured; ruckus by the radicals continues despite change in prayer timings of both communities !
How do the radicals pelt stones on Hindus despite change in prayer timings !
One… pic.twitter.com/vKh028uDCb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2024
१. १२ मार्च या दिवशी झालेल्या दंगलीप्रकरणी एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात ४० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
२. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजांच्या प्रार्थनेच्या वेळा पालटून दिल्या होत्या; मात्र असे असतांनाही १३ मार्च या दिवशी आरतीनंतर येथे धर्मांधांनी हिंदूंवर पुन्हा दगडफेक केली.
३. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वात पंचक्रोशीतील अनुमाने दीड सहस्र तरुणांनी एकत्र येत महाआरती केली.
- या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले.
- या हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी पुष्पा गार्डन ते मदिना मशीद आणि आंबेडकर चौकातून असे २ रस्ते आहेत.
- हनुमान मंदिरातील महाआरतीला दीड सहस्रांहून अधिक लोक उपस्थित होते. महाआरतीनंतर लोकांनी उपस्थित नेते राजेंद्र जंजाळ यांच्या समक्ष घोषणा देण्यास प्रारंभ केला.
४. महाआरतीनंतर घोषणा देणार्या जमावास पोलिसांनी पांगवले; मात्र काही वेळाने ४० ते ५० हिंदु तरुण मोटारसायकलवरून या रस्त्यावरून जात असतांना त्यांच्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. यात मुकुंदनगर येथील शुभम राठोड (वय १८ वर्षे), अविनाश बोंद्रे (वय १९ वर्षे) आणि सागर बंजारे (वय २४ वर्षे) हे ३ तरुण घायाळ झाले.
५. एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यासमवेत १२ मार्चच्या दंगलीप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
६. चिकलठाणा परिसरातील माजी नगरसेवक संजय चौधरी आणि पुष्पा गार्डन भागातील माजी नगरसेवक सोहेल शेख यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले. ‘गावात हिंदु आणि मुसलमान समाजांतील सौख्य टिकवून ठेवत एकोप्याने राहू’ असा संदेश या दोघांनीही दिला. ‘बाहेरील लोकांमुळे चिकलठाणा येथे तणाव निर्माण झाला आहे’, असे त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांना प्रार्थनेची वेळ पालटून दिल्यानंतरही ते पुन्हा हिंदूंवर दगडफेक कशी करतात ? यातून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे का ? अशी शंका येते. समजा जर हिंदूंनी धर्मांधांवर दगडफेक केली असती, तर पोलिसांनी एव्हाना अनेक हिंदूंना अटक केली असती, आता पोलीस धर्मांधांना अटक करण्याचे धाडस दाखवणार का ? |