Terrorist Farhatullah Ghori : पाकमध्ये लपलेल्या आतंकवाद्याची भारताच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी !
नवी देहली – जैश-ए-महंमदशी संबंधित असलेला जिहादी आतंकवादी फरहतुल्ला घोरी याने भारताच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी देणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. घोरी हा वर्ष २००२ मध्ये गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असून तो सध्या पाकच्या लाहोर शहरात लपला असल्याचे म्हटले जाते. फरहतुल्ला घोरी हा मूळचा भाग्यनगरचा रहिवासी आहे. घोरी इस्लामिक स्टेट या संघटनेत नव्या लोकांना भरती करण्याच्या कामातही सक्रीय होता. भारताच्या गृह मंत्रालयाने वर्ष २०२० मध्ये त्याला आतंकवादी म्हणून घोषित केले होते.
संपादकीय भूमिकापाकमध्ये घुसून अशांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून फाशीची शिक्षा देण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक ! |