India China Border Dispute : (म्हणे) ‘एकमेकांवर विश्वास ठेवला, तर गैरसमज दूर होऊन आपले नाते भक्कम होईल !’ – चीन
विश्वासघातकी चीनचे भारताविषयी विधान !
बीजिंग (चीन) – भारत-चीन सीमा वाद दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय संबंधांचे प्रतिनिधित्व करत नाही. आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. यामुळे आपल्यातील गैरसमज दूर होतील आणि आपले नाते भक्कम होईल, असे विधान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी केले. नुकतेच भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले होते की, जोपर्यंत सीमावाद सुटत नाही, तोपर्यंत भारत-चीन संबंध सामान्य होऊ शकत नाहीत.
संपादकीय भूमिकाएकमेकांनी विश्वास ठेवायला चीन विश्वासू आहे का ? चीनवर ज्याने विश्वास ठेवला त्याचा आत्मघात झाला, असाच इतिहास आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे ! हा अनुभव गाठीशी असणारा भारत चीनवर विश्वास ठेवू शकत नाही ! |