23 Dog Breeds Banned : बुलडॉग, रॉटवेलर, पिटबुल आदी कुत्र्यांच्या २३ जातींवर बंदी येणार !
केंद्रशासनाने राज्य सरकारांना दिला आदेश !
नवी देहली – कुत्र्यांची माणसांवरील आक्रमणे आणि परिणामी मृत्यू यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारांना दिलेल्या या आदेशात म्हटले आहे की, २३ जातींच्या कुत्र्यांच्या आयातीवर बंदी घाला ! यासह त्यांच्या प्रजननासाठी परवाने देण्यात येऊ नयेत, तसेच विक्रीवरही बंदी घालण्यास सांगण्यात आले आहे. २३ जातींच्या सूचीत बुलडॉग, रॉटविलर, पिटबुल, वुल्फ डॉग, टेरिअर यांचाही समावेश आहे. या कुत्र्यांच्या मिश्र जाती आणि संकरित जाती यांवरही बंदी घालण्यात यावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. प्राणी कल्याण संस्था आणि तज्ञ यांच्या समितीने दिल्ली उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानंतर केंद्रशासनाने वरील पाऊल उचलले आहे. अमेरिका, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, ब्रिटन, आयर्लंड, रोमानिया, कॅनडा, इटली आणि फ्रान्स यांसह ४१ देशांमध्ये पिटबुल कुत्र्याच्या जातीवर बंदी आहे.
अलीकडच्या काळातील कुत्र्यांनी केलेल्या आक्रमणांच्या काही घटना !
- ११ मार्च २०२४ : उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे एका पिटबुलचे २ वर्षांच्या मुलावर आक्रमण; मुलाच्या डोक्याला गंभीर जखमा !
- ऑक्टोबर २०२३ : हरियाणातील हिस्सार येथे पिटबुलचे एका मुलीवर आक्रमण; मुलीच्या पोटाला, पायाला आणि शरिराच्या इतर भागांचा चावा !
- जानेवारी २०२३ : उत्तरप्रदेशातील मेरठ येथे एका रॉटवेलरचे पंजाबी अभिनेते रोहित यांच्या हाताला आणि पायाला चावा !