पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांचे निलंबन मागे घ्या !

देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !

आंदोलन करताना हिंदुत्वनिष्ठ

नवी देहली – पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी ८ मार्चला येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या जमावाला लाथ मारून हाकलण्याचा प्रयत्न केला होता. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी हिंदु संघटनांनी १२ मार्चला देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करत मनोज तोमर यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. हिंदु रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र चौधरी उपाख्य पिंकी यांनी या आंदोलनाचे आवाहन केले होते.

सौजन्य TheSootr