अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !
मुंबई – अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याविषयी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटना यांनी राज्यशासनाकडे मागणी केली होती. अहमदनगर महानगरपालिकेनेही याविषयी ठराव पाठवला होता. त्यानुसार राज्यशासनाने केंद्रीय गृहविभागाकडे या नामकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर हे नामकरण अधिकृतरित्या लागू केले जाईल.