संध्या वंदन विधी
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘आसन म्हणजे लाकडी पाटावर बसावे अथवा दर्भासन असावे किंवा धूतवस्त्राचे आसनही चालेल. आसन सुखदायी असावे. ‘चित्त विचलित होणार नाही’, असे मृदु आसन असावे. पाठीचा कणा ताठ असावा. मान सरळ असावी. आरामात बसावे. भिंतीला टेकून, कुशीवर पडून अथवा आडवे होऊन संध्योपासना करू नये. संध्या मध्येच खंडित करून कुणाशी बोलू नये. आदळ-आपट नको. आल्या-गेल्याशी बोलणे नको. खाणाखुणा नकोत.
आरंभी आचमन करायचे. नंतर विष्णूला २४ नावांनी नमस्कार करायचा आहे. संध्येत जे जल अर्घ्य म्हणून दिले जाते, त्याचे वज्र बनून ते असुरांना मारते. ‘त्रिपदा गायत्री’, ‘ॐ कार ब्रह्म,’ ‘ऋतं च सत्यम्’ या वेदमंत्रात असुरप्रतिकाराचे सामर्थ्य आहे.
सूर्याेदयापूर्वी २ घंटे पूजा इत्यादी आन्हिक उरकल्यावर गायत्री मंत्रोपासनेकरता सर्वाेत्कृष्ट वेळ आहे. शास्त्रांनी सांगितले आहे की, अरुणोदयापर्यंत गायत्री मंत्र जप करावा. सूर्याेदयाला प्रातः संध्या करावी.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २००९)