२ सहस्र भारतीय डॉक्टर ब्रिटनला जाणार !
लंडन (ब्रिटन) – इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (एन्.एच्.एस्.मध्ये) डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून २ सहस्र डॉक्टर पाठवले जाणार आहेत. यासाठी ‘एन्.एच्.एस्.’च्या वतीने भारतातील ९ प्रमुख शहरांमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल. ‘एन्.एच्.एस्.’ने इंग्लंडमधील २३ वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक बनवले आहे. ते भारतात येऊन पदव्युत्तर डॉक्टरांना प्रशिक्षण देतील.
2000 #Indian doctors to go to #Britain !
The number of Indian doctors in Britain is expected to double in the next 10 years! pic.twitter.com/wNnXbevH9r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 13, 2024
१० वर्षांत भारतीय डॉक्टरांची संख्या होणार दुप्पट !
ब्रिटनमध्ये सध्या ३० सहस्रांहून अधिक भारतीय डॉक्टर कार्यरत आहेत. येत्या १० वर्षांत भारतीय डॉक्टरांची संख्या ६० सहस्र म्हणजे दुप्पट होण्याची शक्यता आहे. ‘एन्.एच्.एस्.’चे माजी मुख्य कार्यकारी सायमन स्टीव्हन्स यांनी सांगितले की, ब्रिटनमधील प्रतिष्ठित साऊथ वेल्स, बोल्टन आणि प्लायमाउथ विद्यापीठ येथे भारतातून येणार्या डॉक्टरांसाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.