सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने साधकाच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सर्वसाधारण होण्यासह रक्तदाबाचा त्रास न्यून होणे
‘माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १८.७ ग्रॅम / डेसीलिटर इतके होते. (‘सर्वसाधारणपणे निरोगी पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १४ ते १८ ग्रॅम / डेसीलिटर, इतके असते.’ – संकलक) मला उच्च रक्तदाबाचाही त्रास आहे. माझा रक्तदाब १५० / १०० mmHg इतका असायचा. (‘सर्वसाधारण निरोगी व्यक्तीचा रक्तदाब १२० / ८० mmHg इतका असतो.’ – संकलक) उच्च रक्तदाबाचा त्रास न्यून होण्यासाठी मी औषधेही घेत होतो.
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण न्यून होण्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्रीराम जयराम जय जय राम । श्री गुरुदेव दत्त । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप २ – ३ मास प्रतिदिन १ घंटा केला. त्यामुळे ‘माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १५.५ ग्रॅम / डेसीलिटर, इतके झाले, तसेच कोणतेही औषध न घेताही माझा रक्तदाब १३० / ८५ mmHg इतका झाला’, त्याबद्दल मी सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |