New Zealand On Nijjar Case : निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?
न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्न !
नवी देहली – कॅनडामध्ये गेल्या वर्षी हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केला होता. या प्रकरणी न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी ‘निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?’ अशा प्रश्न उपस्थित केला आहे. विन्स्टन पीटर्स सध्या भारताच्या दौर्यावर आहेत.
New Zealand's Deputy Prime Minister Winston Peters questions Canada's accusation!
What is the proof behind the accusation that #India was involved in #Nijjar 's murder?
Canadian Prime Minister Trudeau's accusations are only aimed at securing the votes of the #Khalistani #Sikhs… pic.twitter.com/tVpOrZuPsO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 13, 2024
विन्स्टन पीटर्स यांना मुलाखतीत या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी ते म्हणाले की, ज्या वेळी हे प्रकरण घडले, त्या वेळी न्यूझीलंडमध्ये आम्ही सत्तेत नव्हतो. आम्ही आता सत्तेत आहोत; मात्र तुम्ही विरोधात असलात, तरी तुम्ही ‘फाईव्ह आईज’ (अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा एक गट) देशांबरोबर देवाण-घेवाण करण्यात आलेली माहिती ऐकत असता; पण ती माहिती किती कामाची आहे ?, याची तुम्हाला कल्पना नसते. सत्तेत आल्यानंतर एक अधिवक्ता म्हणून मी याप्रकरणाचा अभ्यास केला, तेव्हा मला याप्रकरणी कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही.
संपादकीय भूमिकाकॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे आरोप केवळ कॅनडातील खलिस्तानवादी शिखांची मते मिळवणे आणि शीख खासदारांचा सरकारला पाठिंबा कायम ठेवणे, यांसाठी असल्याने ते या प्रश्नाचे उत्तर कधीही देणार नाहीत ! |