विस्तारवादी चीनच्या विरोधात भारताची रणनीती !
परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चीनविरोधातील घडामोडींविषयीचे भाष्य !
युद्धखोर आणि विस्तारवादी चीनचा सामना करण्यासाठी केवळ गेल्या एका आठवड्यातील भारताची रणनीती पहा.
१. लक्षद्वीपजवळ मालदीवमधील चिनी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘आय.एन्.एस्. जटायू’ या लष्करी तळाची उभारणी केली.
२. भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये ‘सेला’ या दुहेरी भुयारी मार्गाचे उद्घाटन झाले. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ने केवळ ५ वर्षांत हे काम पूर्ण केले.
३. आता भारताने १० सहस्र सैन्य भारत-पाक सीमेवरून भारत-चीन सीमेवर हलवले.
अशा पालटलेल्या भारताची चीनने कधीच अपेक्षा केली नव्हती; म्हणून चीनचा जळफळाट वाढला आहे. यामुळे चीनच्या केवळ हिंदी महासागरातील नाही, तर मालदीववरील वाढत्या प्रभावावरही नियंत्रण ठेवता येणार.
चीनकडे जाणारा भारतीय केसांचा बेकायदेशीर साठा कह्यात !
जगात सर्वाधिक केसांची निर्यात करणारा देश भारत आणि सर्वाधिक केस आयात करणारा देश चीन आहे. कोरोना महामारीच्या नंतर चीनमध्ये केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या कोट्यवधी तरुणांना आहे. त्यामुळे चीनने भारतातून केसांची आता सरळ सरळ ‘स्मगलिंग’ (तस्करी) चालू केली आहे. नुकतेच चीनकडे बेकायदेशीरपणे जाणारा १ अब्ज किमतीचा केसांचा साठा भारतात कह्यात घेण्यात आला. भविष्यात भारत-चीनमधील व्यापारी तूट कमी करण्यात ‘केस’ महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असे दिसते.
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुकवरून साभार)