धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवर धारकर्यांकडून सामूहिक मुंडण !
कोल्हापूर – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर विभागातील धारकरी बांधवांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या पार्श्वभूमीवर प्रयाग चिखली येथील संगमावर सामूहिक मुंडण केले. या प्रसंगी ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र, पू. भिडेगुरुजी लिखित ‘श्री संभाजीसूर्यहृदय’ श्लोक पठण करून महाराजांना वंदन करण्यात आले. या वेळी शहर कार्यवाह आशिष लोखंडे, सर्वश्री अवधूत चौगुले, आशिष पाटील, आदित्य जासूद, तनय मोरे, आदित्य जमदाडे, संदीप पाटील, जीवन चौगुले यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या बलीदानाचे स्मरण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत १ मास गोड पदार्थ न खाणे, १ वेळचे भोजन, तसेच आवडणारे पदार्थ व्यर्ज करतात. प्रतिदिन सायंकाळी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.