अयोध्येत ९ सहस्र ४२० चौरस मीटर भूमीवर ‘महाराष्ट्र भवना’ची निर्मिती होणार !
मुंबई – अयोध्येत ९ सहस्र ४२०.५५ चौरस मीटर भूमीवर महाराष्ट्र भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे. भूमी खरेदीसाठी ६७ कोटी १४ लाख रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. ११ मार्च या दिवशीच्या मंत्रीमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली. शहानवाजपूर येथे या भवनाची निर्मिती केली जाईल. अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार्या महाराष्ट्रातील भाविकांच्या निवासाची येथे अल्प दरात व्यवस्था होईल.