सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे’, हा एक प्रकारे नामजपच आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. अवंतिका अतुल दिघे : सेवा करतांना माझ्याकडून नामजप होत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सेवा एकाग्रतेने होते ना ? भावपूर्ण होते ना ?

सौ. अवंतिका अतुल दिघे : हो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे’, हा एक प्रकारे नामजपच आहे. त्यामुळे ‘नामजप होत नाही’, असा विचार करायला नको.

केवळ कार्य नको असल्याने ‘व्यष्टी साधना ही सेवा आहे’, या भावाने करावी !

कु. सुषमा लांडे : सेवा करायला चांगले वाटते; पण व्यष्टी साधना करावीशी वाटत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपल्याला कार्य नको. ते व्यावहारिक आहे. ‘व्यष्टी साधना ही सेवाच आहे’, या भावाने करावी, म्हणजे कुठेही गेलो, तरी आनंदी रहाता येते.

कुटुंबातील कुणी आजारी असल्यास आजारपण त्याच्या प्रारब्धानुसार असल्याने त्याकडे साक्षीभावाने पहावे !

कु. सुषमा लांडे : माझे नातेवाईक आजारी आहेत. त्यांची काळजी वाटते. ‘त्यांचे कसे होईल ?’, असे विचार मनात येतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्यांच्या प्रारब्धानुसार जसे व्हायचे, तसे होईल. आपण त्याकडे साक्षीभावानी पहायचे. फार तर प्रार्थना करू शकतेस; पण त्याचा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही.