श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील ‘देवीतत्त्व आणि त्यांनी सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे’, यांविषयी साधकाला आलेल्या अनुभूती
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साक्षात् देवीच आहेत’, हे दर्शवणार्या अनुभूती
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रार्थना केली जाणे : ‘पूर्वी माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले किंवा भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना व्हायची; पण आता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाच अधिक प्रार्थना केल्या जातात.
१ आ. प्रार्थना करतांना साधकाला ‘तो भवानीदेवीच्या समोर, म्हणजेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समोर बसल्याचे जाणवून त्या ‘आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रार्थना करतो. त्या वेळी ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे भवानीदेवीच्या समोर, म्हणजेच ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समोर बसलो आहे’, असे मला जाणवते. श्री भवानीदेवीने छत्रपती शिवरायांना ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेसाठी भवानी तलवार दिली. त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी आशीर्वाद (म्हणजेच शक्ती) देत आहेत’, असे जाणवते. यातून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साक्षात् देवीच आहेत’, याची मला अनुभूती येते.
२. प्रार्थना करण्यासाठी हात जोडल्यावर
अ. मी देवाला प्रार्थना करण्यासाठी हात जोडतो. त्या वेळी तेथे ‘मी नसून माझ्या ठिकाणी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ हात जोडून उभ्या आहेत’, असे मला जाणवते.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई नमस्काराची मुद्रा करतात. ते दृश्य मला दिसते आणि ‘त्यांच्या चेहर्यावर जसा भाव आणि स्मितहास्य असते, तसाच भाव माझ्या चेहर्यावर आहे’, असे मला जाणवते. यामुळे ‘नमस्कार करतांना मला चैतन्य मिळत आहे’, असे नेहमी वाटते.
३. परात्पर गुरुदेवांना निर्गुणातून अनुभवतांना त्यांचे आणि श्रीसत्शक्ति बिंदाताई यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे
मी परात्पर गुरुदेवांना निर्गुणातून अनुभवण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी मला त्यांचे अस्तित्व जाणवते, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचेही अस्तिव जाणवते. (महर्षींच्या सांगण्यानुसार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ असे घोषित केल्यापासून मला असे जाणवू लागले आहे.)
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन
अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे माझ्या प्रत्येक कृतीकडे लक्ष आहे’, असे मला वाटते.
आ. माझ्या मनात एखादा विचार आल्यानंतर ‘मी तो विचार त्यांना सांगत आहे’, असे मला जाणवते.
इ. काही वेळा मला सेवा करतांना काहीच सुचत नाही. त्या वेळी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘मी सेवा कशी करू ?’, असे विचारतो. तेव्हा ‘सेवा कशा पद्धतीने करायला हवी ?’, हे त्या सांगत आहेत’, असे मला जाणवते. त्यानुसार माझ्याकडून सेवेचे प्रयत्न होतात आणि माझा सेवेचा ताण न्यून होतो.
ई. काही वेळा मला माझ्या सेवेतील चुका लक्षात येतात. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईच मला त्या चुका सांगत आहे’, असे जाणवते. तेव्हा ‘मला त्यांच्या बोलण्याचा आवाजही ऐकू येत आहे’, असे जाणवते.
उ. माझ्यात ‘उतावळेपणा’ हा स्वभावदोष प्रबळ आहे. मी कुठलीही कृती घाईने करतो. त्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे स्मरण होऊन ‘त्या प्रत्येक कृती एकाग्रतेने, शांतपणे अन् भावपूर्ण रीतीने करतात’, हे आठवते. तेव्हा ‘मी करत असलेली कृती शांतपणे करायला हवी’, याची मला जाणीव होते आणि ‘श्रीसत्शक्ति बिंदाताईच ती कृती करवून घेत आहेत’, असे वाटते.
५. शारीरिक स्थिती ठीक नसतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रत्यक्ष भेटीचे आणि त्यांच्या उद्गारांचे स्मरण होऊन भावजागृती होणे
माझी कधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली की, त्या माझी विचारपूस करतात. नंतर त्यांचे बोलणे आठवून माझा भाव जागृत होतो. एकदा भेट झाल्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘अपूर्व, बरा आहेस ना ?’’ खरेतर मला काही मासांपासून पुष्कळ शारीरिक त्रास होत होते; पण ‘साक्षात् देवीनेच (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनीच) मला विचारले आहे, ‘बरा आहेस ना ?’, म्हणजे ‘मी बराच असणार’, असा विचार माझ्या मनात आला.
ज्या ज्या वेळी माझी शारीरिक स्थिती ठीक नसते, त्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या या वाक्याची आठवण येते आणि माझी भावजागृती होऊन मला बरे वाटते. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई, ‘सर्व साधकांना तुमचा सत्संग सतत लाभू दे’, अशी मी प्रार्थना करतो. परात्पर गुरुमाऊली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अपूर्व ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|