पाकमधील हिंदू आता मोकळा श्‍वास घेऊ शकतील ! – पाकस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया

सीएए कायदा लागू केल्यावरून जगभरातून विविध प्रकारांच्या प्रतिक्रिया !

सीएए कायदा ही खर्‍या लोकशाहीची ओळख असल्याचे अमेरिकी गायिका मेरी मिलबेन यांचे मत

(सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा (सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट))

दानिश कनेरिया

नवी देहली – वर्ष २०१९ मध्ये सीएए कायदा केल्यानंतर एका अधिसूचनेद्वारे केंद्रशासनाने तो ११ मार्चच्या सायंकाळी देशभरात लागू केला. यावर जगभरातून विविध प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पाकचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी यावर म्हटले की, या कायद्यामुळे पाकिस्तानमधील हिंदू आता मोकळा श्‍वास घेऊ शकतील. सीएए लागू केल्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मी आभार मानतो.

सौजन्य News Nation

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनीही या कायद्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी देशाला एका शांततेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा कायदा म्हणजे खर्‍या लोकशाहीची ओळख आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील ख्रिस्ती अन् अन्य धर्मीय यांना त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य मिळणार आहे. या ३ देशांतील मुसलमानेतरांना ज्या छळाला सामोरे जावे लागत आहे, त्यांना आता अभय मिळणार आहे. त्यांना त्यांची वेगळी ओळख मिळणार आहे.

मेरी मिलबेन पुढे म्हणाल्या की, धार्मिक स्वातंत्र्याला जागतिक स्तरावरील वेगळी ओळख म्हणून ज्या ‘सीएए’ कायद्याची घोषणा करण्यात आली, त्यासाठी एक ख्रिस्ती महिला म्हणून मी मोदी यांची आभारी आहे.