जैसलमेर (राजस्थान) येथील वाळवंटात ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले !
दोन्ही वैमानिक सुखरूप
जैसलमेर (राजस्थान) – येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.
IAF’s Tejas Light Combat Aircraft (LCA) crashes near Rajasthan’s Jaisalmer.
Both the pilots ejected safely.pic.twitter.com/i4E8T4RJSY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 12, 2024
सौजन्य TIMES NOW
त्यांनी विमान खाली पडण्यापूर्वी ‘पॅराशूट’द्वारे बाहेर उडी मारल्याने ते बचावले. राजस्थानच्या पोखरणमध्ये तिन्ही सैन्यदलांच्या सरावामध्ये हे विमान सहभागी झाले होते, असे सांगितले जात आहे.