मनोज जरांगे यांच्यासह आयोजक आणि समन्वयक यांच्यावर गुन्हा नोंद !
वाघोली (पुणे) येथे विनाअनुमती सभा घेतल्याचे प्रकरण
पुणे – सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश असतांनाही पुणे येथील वाघोली परिसरामध्ये २४ जानेवारीला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विनाअनुमती सभा घेतली. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह सभेचे आयोजक आणि समन्वयक गणेश म्हस्के, संदीप कांबिलकर, शेखर पाटील अन् इतर ८ ते १० जण यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी पहाटे ध्वनीवर्धक लावण्यास मनाई केली होती. तरीही आयोजकांनी विनाअनुमती ध्वनीवर्धक लावणे, विनाअनुमती सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन करणे यांप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.